आता मुंबईकरांच्या खिशाला लागणार कात्री! रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ

0
90

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणानं (एमएमआर) रिक्षा व टॅक्सीच्या भाडेवाढीला परवानगी दिली आहे. रिक्षा व टॅक्सीच्या किमान भाड्यात ३ रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार रिक्षाचे किमान भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये करण्यात आले आहे, तर टॅक्सीचे किमान भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले आहे.
रिक्षाने प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना आता २१ रुपये मोजावे लागणार आहेत, तर टॅक्सीनं प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना २५ रुपये मोजावे लागणार आहेत.ही भाडेवाढ प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी आहे.