तापसी-अनुरागवर आता ‘ईडी’ची टांगती तलवार

0
59

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर बुधवारी रात्री इन्कमटॅक्सचा छापा पडला आहे. तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घरामधील कोपऱ्या कोपऱ्यांचा शोध घेण्याचे काम जलद गतीने सुरु आहे.  

त्यादरम्यान पुण्याच्या एका नामवंत हॉटेलमध्ये अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांचीही खूप वेळ चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर गुरुवारीही इन्कमटॅक्सचे हे छापे अजूनही सुरूच आहेत. ज्या 2 राज्यांच्या आयकर अधिकाऱ्यांनी या कलाकारांच्या घरांवर छापे टाकले आहेत. यामध्ये  तीन अधिकारी हे उत्तर प्रदेशचे, तर तीन महाराष्ट्रातील होते. दरम्यान, आता अशी माहिती समोर येत आहे की, अनुराग आणि तापसी यांच्या घरावर ईडीकडून देखील छापा टाकला जाऊ शकतो.