आजच्या काळात फक्त १० रुपयात जेवण, कुठे?

0
71

कोरोनाच्या काळात काहींची नोकरी गेली, तर काही लोक रस्त्यावर आले. अशा लोकांना मदतीचा हात देणारे काही लोक आपल्याला दिसून येतात. आजच्या जगातही काही लोक हि किती उदार मनाचे असत्तात याचे उदाहरण पाहायला मिळते. तसेच एक उदहरण म्हणजे लोअर परेल स्टेशनजवळ एक गाडी उभी राहते. त्या गाडीवर फक्त १० रुपयात पोटभर जेवण ते हि अनलिमिटेड मिळत.

आजच्या महागाईच्या काळात ही १० रुपयात पोटभर जेवण म्हणजे आश्चर्याची बाब आहे. शिवाजी पार्क येथील रोटरी क्लब ऑफ मुंबई याद्वारे १० रुपयात अनलिमिटेड जेवणाची हि सुविधा आणि सेवा जनतेसाठी त्यांनी उपलब्ध केली आहे.

त्या गाडीवरील काम करणा-या महिलेशी संवाद साधल्यानंतर कळाले, कि दिवसाला २०० लोकं या जेवणाचा आस्वाद घेत्तात आणि आपले पोट भरतात. यामध्ये दररोज वेगवेगळे पदार्थ दिले जातात. त्यामध्ये डाळभात,भाजीचपाती, खिचडी, बिर्याणी, चाईनीस,पुलाव असे पदार्थ असतात. फक्त त्यांची यामध्ये १ अट असते ती म्हणजे ते तिकडचे जेवण पार्सल देत नाही.

तसेच त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते म्हणाले कि “रोटरी क्लब ऑफ मुंबईकडून हि जनतेची सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. तसेच आम्ही २०० लोकांचे टार्गेट धरलं होत मात्र त्यापेक्षा जास्त लोक आता या जेवणाचा आस्वाद घेतात्त, आणि आपली पोट भरतात.”

तसेच तिथे जेवणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यावर त्यांनी सांगितले कि, १० रुपयात इथे पोटभर जेवण मिळत, जे आजच्या जगात नाही कुठे मिळत, आणि जेवण देखील अगदी स्वदिष्ट आहे”. तसेच आजूबाजूला रहदारीचा रस्ता असल्यामुळे खूप लोक या जेवणाचा आस्वाद घेतात. अशाप्रकारे आजच्या काळात खूप कमी पैशात पोटभर जेवणाची हि सुविधा लोकांना खुश करून टाकणारी आणि कित्येकांची भुकेलेली पोट भरणारी आहे.