‘दगडू’ झडकणार ‘ओह माय घोस्ट’ हॉरर चित्रपटात, १२ फेब्रुवारीला होईल प्रदर्शित

0
65

मराठी बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावणाऱ्या टाईमपास सिनेमाची आजही चर्चा होते. या सिनेमातील दगडू या पात्राला प्रेक्षकांनी खुप पसंती दिली. दगडू या भूमिकेतून अभिनेता प्रथमेश परब याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र प्रेमकहाणी मधून प्रथमेश आता ‘ओह माय घोस्ट’ या चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.हॉरर आणि फनी चित्रपटात जग्गू नावाच्या एका अनाथ युवकाचे पात्र प्रथमेश साकारणार. एकंदरीत हॉरर कॉ़मेडी कथा या चित्रपटातून पाहता येणार आहे.हा चित्रपट उद्या (12 फेब्रुवारी) रिलीज होत आहे. प्रथमेशने कव्हर पीक शेअर करत सर्वांनी चित्रपट नक्की बघावा यासाठी फॅन्सला मॅसेज सुद्धा दिलाय.चित्रपटाची निर्मिती सना वसिम खान आणि रोहनदीप सिंह यांनी केलीये.