अरे बापरे! ठाण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण 

0
50

कोरोनाचा संसर्ग वाढण्यास पुन्हा सुरवात झाली आहे. यामध्ये आता ठाण्यातील एका हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ठाणे पालिकेकडून हे हॉटेल सील करण्यात आले. एकाच हॉटेलमधील एवढे कर्मचाऱी पॉझिटिव्ह आल्याने ठाण्यात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ठाणे-घोडबंदर रोडवरील एक्सप्रेस इन हे प्रसिद्ध हॉटेल असल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी या हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या कोरोना चाचणीचा रिपोर्ट शुक्रवारी आल्यानंतर हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांची भांबड उडाली .