दमलेल्या रिक्षावाल्या आजोबांची कहाणी…

0
78
source- twitter
source- twitter

नातवंडांना शिक्षण देण्यासाठी मुंबईत एक आजोबा दिवसरात्र रिक्षा चालवत असल्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यूनंतर नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारी म्हाताऱ्या देसराज यांच्यावर आली. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांनी नातवंडांना शिक्षण सोडू दिले नाही. आता नातीला 12वीत 80 टक्के गुण मिळालेत आणि तिला शिक्षक व्हायचे आहे. मात्र पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीत जायचे आहे. या शैक्षणिक खर्चासाठी देसराज यांनी घर विकले. नातवंडांसह कुटुंबियांना गावी तर नातीला पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीला पाठवले. नात शिक्षक होईल असा त्यांना ठाम विश्वास आहे. मात्र घर विकल्याने देसराज आजोबा रिक्षात आयुष्य काढत आहेत. दिवसभर रिक्षा चालवून रात्री रिक्षातच झोपत आहेत. व्हायरल बातमीनंतर अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत 276 दानशूर व्यक्तींकडून एकून 5.3 लाखांची मदत मिळाली आहे.