कुटुंबासह नजरकैद केल्याचा ओमर अब्दुल्ला यांचा दावा

0
35

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी दावा केला की त्यांचे वडील आणि खा. फारूक अब्दुल्ला यांच्यासह त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अधिकाऱ्यांनी नजरकैद केले आहे. “ऑगस्ट 2019 नंतर हे “नवीन जम्मू-काश्मीर” आहे. कोणतंही स्पष्टीकरण देता आम्हाला नजरकैद करण्यात आलं आहे. माझ्या वडिलांना आणि मला आमच्या घरात लॉक केले आहे, हे खूप वाईट आहे, त्यांनी माझ्या बहिणीला आणि तिच्या मुलांनाही घरातच लॉक केले आहे.” अशी माहिती ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

सोबतच, “चला, आपल्या लोकशाहीचे नवीन मॉडेल म्हणजे आम्हाला आमच्या घरात स्पष्टीकरण न देता ठेवले जाते परंतु मुख्य म्हणजे घरात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना परवानगी दिली जात नाही आणि मग तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अजूनही संतप्त आणि कडू आहे.” असंही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.