बापरे! महिलेच्या हत्येनंतर शिजवलं हृदय, कुटुंबीयांना मारण्याआधी वाढलं जेवायला 

0
35

अमेरिकेतील ओकलाहोमा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली.ज्या क्रूरतेने आरोपीने हत्या केली, ते ऐकून सर्वच हादरून गेले. या प्रकरणात पोलिसांनी लॉरेन्स पॉल अँडरसन याला अटक केली असून, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.अँडरसनने शेजारच्या कुटुंबातील तिघांची हत्या केली. त्यात ४१ वर्षीय एंड्रिया लीन ब्लेंकशिप हिचाही खून केला आहे. तिच्या हत्येनंतर आरोपीने चाकूने तिचे हृदय बाहेर काढले. त्यानंतर बटाट्यासोबत ते शिजवले अन पीडितेच्या कुटुंबातील लोकांना जेवणासोबत वाढले.
आरोपी अँडरसन हा जानेवारीतच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. तो तुरुंगातून सुटल्यानंतर इतके भयानक कृत्य करील, याचा विचारही कुणी केला नसेल.आरोपी अँडरसनने हत्येमागचे कारण सांगितले आहे. आपल्या कुटुंबीयांना राक्षसांपासून वाचवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली