आरोग्य विभाग परीक्षेत ‘ऑनलाईन’ रॅकेटचे भांडाफोड, मुख्य सूत्रधारास अटक करण्याची मागणी

0
48

औरंगाबाद: आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी राज्यभर परीक्षा होत असून परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरे सोडवून देण्यास मदत करणाऱ्या रॅकेटचा औरंगाबादेत पोलिसांनी भांडाफोड केला आहे. विशेष डिव्हाइस वापरून हे रॅकेट परीक्षार्थींना उत्तरे सोडवून दिली जात होती.सदर परीक्षा रद्द करून पेपर लिक करणारे आणि ह्या कटातील सूत्रधार अटक करा तसेच परीक्षा रद्द करून परीक्षार्थींना खर्च परत करा अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आणि प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाउन असताना महाराष्ट्र भर विविध परीक्षा केंद्रावर ही पदभरती परीक्षा घेतली जात आहे.ह्या परीक्षा मधील गौडबंगाल उघडकीस आला आहे.
औरंगाबाद मध्ये परीक्षे दरम्यान गेवराई येथील परीक्षा केंद्रावर डमी उमेदवार परीक्षा देत असल्याने चिकलठाणा पोलिसांनी गेवराईच्या परीक्षा केंद्रावर डमी उमेदवाराला पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खोकडपुऱ्यातील एका अभ्यासिकेवर धाड टाकुन ऑनलाइन पद्धतीने परीक्षार्थ्यांना उत्तरे सांगणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली आहे.

उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती कोठून आल्या? आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा या रॅकेटमध्ये हात आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.त्याची उकल होणे गरजेचे असून तात्काळ प्रभावाने ह्या परीक्षा रद्द करण्यात यावी.परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांना त्याचा झालेला खर्च शासनाने द्यावा, तसेच ह्या रॅकेटचे सुत्रधार आणि कर्ते करविते ह्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील वंचित ने केली आहे.