Home Blog Page 2

मुंबईमधील डॉक्टरला तीन वेळा कोरोनाची लागण, लसीकरणानंतरही दोन वेळा पोसिटीव्ह

0

कोरोना विषाणू महामारीची सुरुवात झाल्यापासून एकाच व्यक्तीला एका पेक्षा जास्त वेळा विषाणूचा संसर्ग झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र लसीकरणानंतरही संसर्ग झाल्याच्या फार कमी घटना आहेत. आता मुंबईमध्ये जून 2020 पासून मुलुंडमधील एक 26 वर्षीय डॉक्टरला तीन वेळा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावर्षी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही त्या दोनदा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तीनवेळा कोरोना पॉझिटिव्ह डॉ. श्रुती हलारी यांनी सांगितले की वारंवार सकारात्मक चाचणी येणे हे गोंधळात टाकणारे आहे


आता एखाद्या व्यक्तीमध्ये लसीकरणानंतरच्या संसर्गावरील अभ्यासाचा भाग म्हणून जीनोम सिक्वेंसींगसाठी त्यांचे स्वाब नमुने गोळा केले गेले आहेत. डॉ. श्रुती हलारी यांना तीन वेळा कोविड-19 ची लागण कशी झाली याबद्दल कोणतेही स्पष्ट उत्तर नाही. डॉक्टरांच्या पथकाने स्पष्ट केले की यासाठी SARS2 व्हेरिएंटपासून ते त्यांची प्रतिकारशक्ती अशी अनेक कारणे असू शकतात. यामध्ये चुकीचे निदान हेदेखील एक कारण असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

पेगॅसस प्रकरणी राहुल गांधी लोकसभेत मांडणार स्थगन प्रस्ताव

पेगसस प्रकरणावरुन देशभरात कल्लोळ सुरु आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 विरोधी पक्ष आज (बुधवार, 28 जुलै) लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून पेगसस  प्रकरणावर चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी आहे. बुधवारी सकाळी दोन्ही सभागृहातील (राज्यसभा, लोकसभा) विरोधी पक्षांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीस, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लीकार्जून खडगे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, शिवसेना नेते संजय राऊत, यांच्यासह इतरही पक्षांचे नेते उपस्थि त होते. या बैठकीत सरकारला पेगॅससच्या मुद्द्यावरुन घेरण्याबाबत रणनिती ठरल्याचे समजते.

अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

0

भारतीय बॅडमिंटन विश्वाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. बॅडमिंटन खेळासोबत नाटेकर यांना इतरही अनेक खेळांमध्ये ऋची होती. भारताबाहेर विजेतपदक जिंकण्याचा पहिला बहुमानही नंदू नाटेकर यांच्या नावावर आहे. 1956 मध्ये त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटूही होते. त्यांच्या नावावर सहा आंतरराष्ट्रीय पदके आहेत.

अंधेरी परिसरात 4 मजली इमारत कोसळली ,6 जणं जखमी

0

मुंबईमध्ये मध्यरात्री अंधेरीच्या परिसरात 4 मजली कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. जुहू गल्ली परिसरात बांधकाम सुरु असलेली हे घर कोसळलं आहे. ही चार मजल्याचं घर समोरच्या 3 घरांवर कोसळलं आहे. दरम्यान या दुर्घटनेमध्ये काही जणं जखमी झाले आहेत.अंधेरी पश्चिमेत जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका 1+3 असं 4 मजल्याचं बांधकाम सुरू असताना ते समोरच्या 3 घरांवर कोसळलं आहे. या घरांच्या ढिगाऱ्याखाली काही लोकं अडकले होते. दरम्यान मुंबई अग्निशमन दलाचा जवानांनी घटनास्थळावर धाव घेत चार तासांमध्ये अडकलेल्यांना रेस्क्यू केलं आहे.मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये 6 जणं जखमी झाले आहेत. यामध्ये एक अग्निशमन दलाचा अधिकारी आहे या 5 जखमींमध्ये 4 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे 4 ठार, 40 जण बेपत्ता 

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड्यातील होन्जार गावात ढगफुटी झाल्याची बातमी समोर येत आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 30 ते 40 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसापासून देशात मुसळधार पाऊस सुरु आहे.

दरम्यान, खराब हवामानामुळे पोलिस आणि लष्कराच्या जवानांना बचावाकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. जखमींना मदत पोहोचवण्यासाठी हवाई दलाची मदतही घेतली जात आहे. या दुर्घटनेतील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. यामध्ये मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.किश्तवाड उपायुक्ताच्या माहितीनुसार, एसडीआरएफच्या टीमनेही यामध्ये पुढाकार घेतला असून बचावकार्य वेगात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ढगफुटीमुळे किश्तवाडमध्ये सुमारे 9 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

देशात24 तासांत आढळले 42,966 नवे रुग्ण, 641 लोकांचा मृत्यू 

0

देशात कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 42 हजार 966 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 41 हजार 491 लोक उपचार घेत बरे झाले तर 641 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर दुसरीकडे, केरळ राज्यातदेखील नवीन संक्रमितांमध्ये दिवसेंदिवसे वाढ होत आहे. राज्यात येथे मंगळवारी 22 हजार 129 कोरोना पॉझिटिव्ह आले. हा आकडा गेल्या 2 महिन्यात सर्वात जास्त आहे. यापूर्वी 29 मे रोजी 23 हजार 513 लोक कोरोनाबाधीत झाले होते.

Pornography case: गहना वशिष्ठ विरूद्ध मुंबईत FIR दाखल

0

सॉफ्ट पोर्नोग्राफी प्रकरणाने नवं वळण घतेलं आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ होत असताना दिसत आहे. आता कंपनीचे तीन निर्माते आणि गहना वशिष्ठ विरूद्ध मुंबईच्या मालाड मालवानी  पोलीस स्थानकात तक्रार FIR दाखल  करण्यात आली आहे. गहना वशिष्ट अभिनेत्री आणि निर्माती आहे आणि तिने हॉटशॉटसाठी काही दिवसांपुर्वी एक कॉन्टेंट तयार केला. 

फिर्यादी महिला एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हॉटशॉट्स ऍपसाठी पॉर्न शूट करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता. असं अभिनेत्रीने तक्रारीत सांगितलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी मुंबई पोलिस ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 17 प्रवाशांचा मृत्यू

उत्तरप्रदेशातील बाराबंकी येथे रात्री उशीरा भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या डबल डेकर बसला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात 17 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी जाले आहेत. लखनऊ-अयोध्या महामार्गावर हा अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लखनऊ – अयोध्या महामार्गावर कल्याणी नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे. पुलावर डबल डेकर बस बंद पडली होती. बस बंद पडल्याने रस्त्याच्या शेजारी चालकाने उभी केली होती. याच दरम्यान मागून आलेल्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर 6 प्रवाशांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

आयपीएस राकेश अस्थाना यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

0

गुजरात केडरचे 1984 बॅचचे आयपीएस राकेश अस्थाना यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चारा घोटाळ्याच्या चौकशीत आयपीएस राकेश अस्थानाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अस्थाना यापूर्वी सीबीआयमध्ये विशेष संचालकही होते. राकेश अस्थाना हे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.सुकांत सिंह राजपूत ड्रग्स कनेक्शन प्रकरणाचा तपास राकेश अस्थाना यांच्या देखरेखीखाली सुरू झाला. राकेश अस्थाना सध्या बीएसएफचे डीजी आणि एनसीबी प्रमुख होते. राकेश अस्थाना हे 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अस्थाना यापूर्वी सीबीआयमध्ये विशेष संचालकही होती.
सुरत आयुक्त म्हणून राकेश अस्थाना यांनी तथाकथित संत आसाराम बापू प्रकरणाचीही चौकशी केली होती. नुकतीच एस.एन. श्रीवास्तव यांच्या सेवानिवृत्तीनंतर बालाजी श्रीवास्तव यांना कार्यकारी आयुक्त करण्यात आले.

राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित १६ जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य

कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून त्यादृष्टीने  युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

16 जिल्ह्यात 1 हजार 129  पाणीपुरवठा योजना बाधित; 42  कोटी 88 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित

अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र व  इतर अशा एकूण 16 जिल्ह्यांमध्ये 1 हजार 129  पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत. त्यापैकी काही योजनांना तातडीने सुरू करण्यासाठी डिझेल जनरेटरची व्यवस्था,क्लोरीनेशन करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, बोअरवेलची किरकोळ दुरुस्ती,पंपाची दुरुस्ती, पाणीपुरवठा लाईन दुरुस्त करणे या बाबींसाठी 11 कोटी 22 लाख रुपयांचा निधी तात्काळ  लागणार आहे. तर जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी 31 कोटी 65 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. असे एकूण 42 कोटी 88 लाख रुपयांचा खर्च या योजनांसाठी लागणार आहे.तातडीची बाब म्हणून जिल्हा परिषद व स्थानिक प्रशासन त्यांच्या उपलब्ध निधीतून कामे सुरू करण्यात आलेली आहे. यासंदर्भात महसूल तसेच मदत व पुनर्वसन विभागाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी किरकोळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा करणे शक्य आहे तेथे तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. तथापि वीज पुरवठा खंडित झालेला असल्यामुळे ज्या पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा करता येत नाही अशा ठिकाणी स्थानिक स्रोतांमधून (बोअरवेल,विहीर) द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

दरडग्रस्त तळीये गावाची राज्यपालांनी केली पाहणी, पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली 

0

महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीदेखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे, अशा शब्दात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महाड मधील तळीये गावी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

राज्यपाल कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होते, त्यावेळी ते बोलत होते.राज्यपाल कोश्यारी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते सर्व व्यवस्थित करणे कठीण असले तरी सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एकत्रित प्रयत्न केंद्र सरकार व राज्य शासन करील.

चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची एकनाथ शिंदे यांची घोषणा 

0

मुंबई: चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांच्या मदत देण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं या पुरामुळे अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचेदेखील शिंदे यांनी जाहीर केले आहे.
शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळदेखील गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह  पाठवू असंही त्यांनी जाहीर केलं.

राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योजग राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी कनेक्शन समोर आल्यापासून राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला.पॉर्नोग्राफी  प्रकरणी रोज नवे खुलासा समोर येत आहे. आता राज कुंद्रा पॉर्नोग्राफी कनेक्शन प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूचं आहे. 

देशात गेल्या 24 तासांत 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, 415 रुग्णांचा मृत्यू

0

देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 29 हजार 689 नव्या कोरोना बधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या कमी होऊन 3 लाख 98 हजार 100 वर पोहोचली आहे. जाणून घ्या कोरोनाची सद्यस्थिती.आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 14 लाख 40 हजार 951 वर पोहोचली आहे. तर महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 लाख 21 हजार 382 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 42 हजार 363 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 3 कोटी 6 लाख 21 हजार 469 वर पोहोचला आहे.

पीएम मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले ‘दिर्घायुषी व्हा’

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 61 वर्षांचे झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील कोरोनाची आणि पुराची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना ट्विवटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंना दीर्घायुष आणि आरोग्य संपन्न जीवन लाभो असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीमध्ये भेट झाली होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या दोघांमधील ही पहिलीच भेट होती. त्यावर भाजप-शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.