Home Blog Page 3

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग, ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू 

0

देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पदांची भरती प्रक्रिया व पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले.


आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आदी महत्त्वपूर्ण जागा भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रकिया तातडीने पूर्ण करावी, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असेही पवार म्हणाले. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री केदार म्हणाले. तसेच या विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षक तयार होतील, राज्यातून चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास व्यक्त करत कुलगुरू व प्राध्यापकांची निवड तातडीने करून प्रवेश प्रक्रियेला वेग द्यावा, अशा सूचना मंत्री केदार यांनी प्रशासनाला दिल्या.
 

सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित, १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर

सातारा: गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या  नुकसानीमध्ये  जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील  एकूण 1 हजार 324  कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरित करण्यात आले असून एनडीआरएफची  एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

जिल्ह्यातील एकूण 167 गावे पूर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झोलली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पूर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण 30 गावे अंशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील 10 गावे पूर्णत: व 60 गावे अंशत: अशी एकूण 70 गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावे पूर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील 13 गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील 102 गावे अंशत: बाधित झाली आहेत.

जिल्ह्यातील 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यू

जिल्ह्यातील एकूण 18 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण बेपत्ता आहेत तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यू झाला आहे.  यामध्ये वाई तालुक्यात 3 मृत व्यक्ती, 2 जण बेपत्ता व 20 मृत पशुधन, कराड तालुक्यात 3 हजार मृत पशुधन (कोंबडी), पाटण तालुक्यात 12 मृत व्यक्ती व 20 जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात 1 मृत व्यक्ती व 2 मृत पशुधन, सातारा तालुक्यात 2 मृत पशुधन, जावली तालुक्यात 2 मृत व्यक्ती व 2 जण बेपत्ता झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दरडग्रस्त तळिये गावात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दरडग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते सध्या महाडजवळील तळिये गावाची पाहणी करत आहे. दरम्यान, त्यांनी दरडग्रस्त तळिये गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गावातील लोकांनी काही काळजी करण्याचे कारण नाही. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार असून गावातील दरडग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी अडीचच्या सुमारास तळीये गावात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री मुंबईवरुन हेलिकॉप्टरने महाडपर्यंत आणि तिथून रस्तेमार्गे तळीये गावात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. दरम्यान, या सर्वांनी दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी केली आहे.

Tokyo Olympics 2021: एअर पिस्टलमध्ये सौरभ चौधरी अंतिम फेरीत

टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं विजयी सुरुवात केली आहे तर 10 मीटर एअर पिस्टल (पुरुष) स्पर्धेत सौरभ चौधरीनं जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. सौरभ चौधरीनं परफेक्ट 100 स्कोअर केला आहे. तर 10 मीटर एअर पिस्टलमध्ये लावेनिल वालारिवन, अपूर्वी चंडेलाचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आलं आहे.
10 मीटर एअर पिस्टल (पुरुष) स्पर्धेत सौरभ चौधरीनं जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. सौरभ चौधरीनं 10 मीटर एअर पिस्टलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. सौरभ चौधरीने 586 स्कोअर केला आहे. भारताचा अभिषेक वर्मा मात्र फायनलमध्ये पोहोचू शकला नाही.

Tokyo Olympics: भारताला पहिलं पदक, मीराबाई चानूने जिंकले रौप्यपदक

टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्यपदक मिळवलं आहे. मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं.मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.

ठाण्यातील पतपेढी कार्यालयाचा स्ल्याप कोसळला, 3 जण गंभीर जखमी

ठाणे : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे तांडावच बघायला मिळत आहे मात्र यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झली असून अनेक ठिकाणी दुर्घटना वाढल्या आहेत.याचप्रमाणे दिव्यातील सिद्धांत पार्क मधील मार्लेश्वर पतपेढीच्या कार्यालयाच्या इमारतीत वरचा संपूर्ण स्ल्याप कर्मचाऱ्यावर पडल्याने 3 जण गंभीर जखमी झाले आहेत तसेच बचावकार्यासाठी पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे

दुर्घटनाग्रस्त तळीये गावातील ढिगाऱ्यातुन आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढले, आकडा वाढण्याची शक्यता

रायगड : मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. पाणी ओसरले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरडीखालून आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महाड तालुक्यात तळीये 38, पोलादपूर तालुक्यात साखर सुतारवाडी इथे 5  तर पोलादपूर तालुक्यातच केवनाळे इथे 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मदत आणि बचावकार्य सुरुच आहे. रायगडच्या महाडमधील तळीये गावात दरड कोसळल्याने तब्बल 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. तळीये गावात अवघ्या काही महिन्यांच्या मृत बाळाला बाहेर काढले आहे. तळीये गावावर मोठं संकट कोसळले आहे.
महाडमधील तळीये गावाचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. डोंगर कोसळ्याने काही क्षणांत अनेकांचे संसार चिखलात रुतून गेले. अनेक ठिकाणी दरडी कोसळ्याने अनेकांना धोका पोहोचला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफच्या टीमकडून युद्धपातळीवर केले जात आहे. आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तब्बल 50 पेक्षा अधिक माणसे अजूनही ढिगाऱ्याखालीच असल्याची भीती व्यक्त होत आहे.

देशात 24 तासात आढळले 39,496 नवे रुग्ण, 541 रुग्णांचा मृत्यू 

0

देशात गेल्या 24 तासात म्हणजेच शुक्रवारी 39,496 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 35 हजार 124 लोक उपचार घेत बरे झाले तर यात 541 लोकांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतदेखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी उपचार घेणाऱ्यांच्या आकडेवारीत 3 हजार 831 ने वाढ झाली.

जुलै महिन्यात गेल्या 23 दिवसात 5 वेळा सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. यापूर्वी 7, 14, 20 आणि 21 जुलै रोजी यामध्ये वाढ झाली होती. दरम्यान, देशातील सक्रिय रुग्ण संख्येत 1.14 लाखाने घट झाली आहे.

Tokyo Olympics 2021: मेन्स हॉकी टीमचा पहिल्या मॅचमध्येच न्यूझीलंडवर थरारक विजय 

0

टोकयो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याच्या उद्देशानं स्पर्धेत उतरलेल्या भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमनं सुरुवात विजयानं केली आहे. शेवटपर्यंत रंगलेल्या लढताीमध्ये भारतानं न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. भारतीय टीमनं सुरुवातीच्या पिछाडीनंतर पुनरागमन करत विजय मिळवला.

न्यूझीलंडच्या केन रसेलनं 6 व्या मिनिटालाच गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडची ही आघाडी फार टिकली नाही. भारताच्या रुपिंदर पाल सिंहनं 10 मिनिटालाच गोल करत बरोबरी केली. त्यानंतर हरमनप्रीत सिंहनं म 26 व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर भारतीय टीमनं जोरदार खेळ केला. त्यानंतर सात मिनिटांनीच हरमनप्रीतनं दुसरा गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.न्यूझीलंडच्या स्टीफन जेनेसनं 43 व्या मिनिटाला दुसरा गोल करत भारताची आघाडी कमी केली. शेवटच्या टप्प्यातही न्यूझीलंडनं आक्रमक खेळ करत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या बचाव फळीनं त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. भारतानं अखेर हा सामना 3-2 नं जिंकला

राज्यात आतापर्यंत पावसाने घेतले 136 बळी, 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट

गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुढचे दोन-तीन दिवस कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणच्या चिंतेत भर पडली आहे. मध्य महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. 1 जूनपासून राज्यात पावसाचे 136 बळी गेल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. यंदा दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळीये गावात आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप 20 ते 30 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे

32 व्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात, जगात 350 कोटी लोकांनी पाहिला उद्घाटन सोहळा

कोरोना महामारीमुळे एक वर्ष उशीरा होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी संध्याकाळी पार पडला. 32 वी ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनाच्या सावटाखाली होत आहे. सामान्यत: ऑलिम्पिकमध्ये सर्व देशांमधील खेळाडूंचा सलामीचा कार्यक्रम आणि मार्च पास्ट हा मुख्य आकर्षणचा विषय असतो. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे यंदा 1 हजार खेळाडू आणि अधिकारी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अंदाजानुसार, जगभरातील सुमारे 350 कोटी लोक हा उदघाटन सोहळा पाहत आहे. लोक टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप सारख्या उपकरणांवर हा कार्यक्रम पाहत असल्याचे समितीने म्हटले आहे.

वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ

0

मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि.२७ जुलै रोजी होणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड यांनी दिली.वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ व नायगांव येथील शासनाच्या ३४.०५ हेक्टर  जागेवर १९५ चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळ+3 मजल्यांची असून त्यात प्रत्येकी ८० रहिवासी गाळे आहेत. सदरहू चाळींचा पुनर्विकास करुन सदरहू चाळीतील निवासी पात्र गाळेधारकांना ५०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य व मालकीहक्काने देण्यासाठीचा तसेच सदरहू ठिकाणच्या झोपडीधारकांना महाराष्ट्र झोपडपट्टी निर्मुलन अधिनियमातील तरतुदीनुसार पात्र झोपडपट्टी धारकांप्रमाणे २६९ चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बी. डी. डी. चाळींचा पुनर्विकास योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या जमिनीवर  या योजनेद्वारे १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळ्यांव्यतिरिक्त सुमारे ८ हजार १२० विक्रीयोग्य गाळे बांधण्यात येणार आहेत.

किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्त्व संचालयाने सर्किट योजना तयार करावी, अमित देशमुख यांचे निर्देश

0

मुंबईसह महाराष्ट्रात अनेक किल्ले आणि सागरी किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व असून या किल्ल्यांचे जतन, संवर्धन काळानुरुप होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील किल्ल्यांचे वैभव जपत असताना, गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करताना गड किल्ल्यांच्या ठिकाणी आवश्यक त्या पर्यटन सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याने यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राचे असे राज्य संग्रहालय उभारण्यात येणार असून हे संग्रहालय नेमके कुठे असावे, या संग्रहालयात काय काय असावे याबाबींचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्व संचालनालयाने यापूर्वीच एक समिती गठीत केली आहे. या समितीने कोविडच्या काळात दोन बैठका यापूर्वीच केल्या आहेत. राज्य संग्रहालयासंदर्भात पुढील बाबी ठरविण्यासाठी लवकरच सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात यावी, असे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले.

वरळी-शिवडी जोडरस्त्यासाठी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करावे -आदित्य ठाकरे

0

मुंबईतील प्रवास वेगवान व्हावा, वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी शासनाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. वरळी शिवडी जोडरस्ता हा त्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. वरळी आणि शिवडी या दोन्ही बाजूकडे होणारी वाहतूक वरळीच्या जे के कपूर चौकाजवळून होणार असल्याने येथे अतिशय चांगल्या दर्जाचे वाहतूक व्यवस्थापन करावे, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.वरळी-शिवडी जोडरस्ता दर्जेदार पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी वरळीच्या जे के कपूर चौकात भेट दिली तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, महानगरपालिकेचे उपायुक्त तळकर, सहायक आयुक्त शरद उघडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज कुंद्राची 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी कायम

0

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि निर्माता राज कुंद्रा याला अश्लील फिल्मच्या निर्मितीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथेही त्याला दिलासा मिळालेला नाही. राज कुंद्राच्या बेकायदेशीर उद्योगांबद्दल आणखी माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रेयान थोर्पे दोघांनाही आणखी काही दिवस पोलीस कोठडीतच राहावं लागेल. 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीतच ठेवायचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान राज कुंद्रा प्रकरणी दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. राज कुंद्रा अश्लील कंटेट आणि पोर्नोग्राफीची निर्मिती करायचा आणि ते वितरित करण्यासाठी दररोज whatsapp ग्रूप तयार करायचा अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे