पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची लागण

0
31

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आरोग्याच्या बाबींबाबत पाकिस्तानी पंतप्रधानांचे सहाय्यक फैसल सुल्तान यांनी याची घोषणा केली आहे. इमरान खानने स्वत: ला विलगिकरनात ठेवले आहे. इमरान खान यांनी गुरुवारी नुकतीच चीनची कोरोना विषाणू विरुद्धची लस टोचून घेतली होती. लसीकरणानंतरही इमरान खानला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

इमरान खान अजूनही त्यांच्या घरी आहे आणि डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. पाकिस्तानमधील कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या भीतीमुळे पंतप्रधान इमरान खान यांनी गुरुवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.