पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत

0
42

सध्या पाकिस्तानामध्ये महागाई वाढली असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामध्ये दैनंदिन वापरातील वस्तू म्हणजे पीठ,  मसूर आणि भाज्यांचे भाव, अंडी आणि मांसचे भाव तर गगनाला भिडले आहे. लोकांना बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला जनता सध्या सोशल मिडीयाचा खूप वापर करते. प्रत्येक जण आपल्या  सर्जनशीलतेतून लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करत असतो. तर, काही लोक याद्वारे देशाची खरी परिस्थिती देखील मांडतात. यामध्ये सध्या सोशल मिडीयावर सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडिओ खूप  चर्चेचा विषय बनला आहे. तसेच हा व्हिडिओ खूप कमी वेळात खूप पसरला आहे. या व्हिडिओवर सगळी जनता इम्रान खानची जोरदार खिल्ली उडवत आहेत. यशराज मुखाते याने हा व्हिडिओ तयार केला असून,हा व्हिडिओ खूप प्रसारित झाला आहे

या मध्ये इम्रान खान यांचा प्रसिद्ध शब्द ‘घाबरू नका’ हा वारंवार वापरून हा व्हिडिओ तयार केला आहे. तसेच या मध्ये पीठ, साबण आणि साखरेच्या किंमतींबद्दल वारंवार उल्लेख केला असून मुलांच्या फीपासून ते औषधोपचार आणि उपचारांपर्यंतचा विषय देखील मांडण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओद्वारे पाकिस्तान सरकार ताशेरे उडवण्यात आले आहे.