पाकिस्तानात पाडलेले ‘ते’ हिंदू मंदिर पुन्हा बांधण्याचे आदेश

0
87

पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने खैबर-पख्तूनख्वा प्रांत सरकारला मागच्या वर्षी जमावाने नष्ट केलेले १०० वर्ष जुने मंदिर पुन्हा बांधण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने असेही म्हटले आहे की हे मंदिर किती वेळेत बांधले जाईल हे स्थानिक प्रशासनानेही सांगावे.सोमवारी सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. या दरम्यान सरन्यायाधीशांनी अधिकाऱ्यांना मंदिर तोडणाऱ्यांना अटक झाली अथवा नाही हे कोर्टाला सांगावे तसेच दोषींकडून किती वसुली झाली हे सुद्धा सांगावे.