पालघर साधू हत्याकांड: सीबीआय तपासाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

0
34

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने सुनावणी दरम्यान 18 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचे मागील सुनावणीदरम्यान सांगितले होते. तसेच सीबीआय तपासणीची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट केले होते.

16 एप्रिल 2020 रोजी पालघरमध्ये दोन साधूंची हिंसक जमावाने हत्या केली होती. या हत्येनंतर राज्य आणि देशाचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. अखिल भारतीय आखाडा परिषदेने या घटनेचा निषेध करत न्यायालयात जाण्याची तयारीही दर्शवली आहे.

16 एप्रिल 2020ला रात्री 10 च्या सुमारात सुशीलगिरी महाराज, कल्पवृक्ष गिरी महाराज आणि त्यांचा ड्रायव्हर देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान एका गाडीतून अंत्यसंस्कारासाठी जात होते. यावेळी गडचिंचण गावाजवळ हिंसक जमावाने त्यांची हत्या केली. यानंतर जूना आखाड्यातील साधूंनी सीबीआय आणि एआयएची तपासाची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार, डीजीपी, सीबीआय आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवली होती.