‘पालघर हत्याकांड प्रकरणी नवे आरोपपत्र दाखल करा’

0
26

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी महाराष्ट्र सरकारने नवे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. हे आरोपपत्र दोन आठवड्यांच्या आत सादर करावे असे आदेश न्या. अशोक भूषण आणि न्या. आर. एस. रेड्डी यांच्या खंडपीठाने दिले आहेत. पालघर हत्याकांडाप्रकरणी कर्तव्यात कसूर केलेल्या 18 पोलिसांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आल्याचे सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. दूसरीकडे महाराष्ट्र पोलिसांनी पक्षपाती कारवाई केल्याचा आरोप जुना आखाडा आणि साधूंच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास एनआयएकडे द्यावा अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावामध्ये 16 एप्रिलच्या रात्री जमावाने मारहाण करत साधूंची हत्या केली होती. त्यानंतर राज्य आणि देशातील राजकारण पेटलं आहे.