पंढरपूरच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट

0
12
SOURCE- FACEBOOK
SOURCE- FACEBOOK

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. मात्र असं असलं तरी माघी एकादशी निमित्त विठुरायाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला आहे. यामुळे विठुरायाचे रुप अजूनच खुलून दिसत आहे. सजावटीसाठी 2 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. त्यात झेंडू, ब्ल्यू डिडे, आष्टर, कामिनी, गुलाब, शेवंती, ऑर्किड या फुलांचा समावेश आहे.