परमबीर सिंग यांच्यावर अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख

0
18

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठविले होते, ज्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. त्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक आरोप केला आहे.

मात्र, या गंभीर आरोपानंतर ‘माझ्यावर केलेले सगळे आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे. तसेच सिंग यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.