पंतजलीने कोरोनावरील औषध केले लॉन्च

0
38

योगगुरु बाबा रामदेव पुन्हा एकदा कोरोनावर नवं औषध घेऊ आले आहेत. हे औषध वैज्ञानिक दृष्ट्या योग्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या औषधाच्या लोकार्पणानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. कोरोनिल टॅबलेटने कोरोनाचा उपचार करता येईल असा दावा पतंजलीने केला आहे. आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला औषध म्हणून स्वीकार केला आहे. नवं कोरोनिल औषध CoPP-WHO GMP सर्टीफाईज आहे. या औषधाला 154 देशांची मान्यता मिळाल्याचं सांगण्यात आले आहे. योग आयुर्वेदच्या रिसर्चवर आधारित हे औषध असल्याचे पंतजलीने सांगितले आहे.