मुंबईत रुग्णांचा आलेख वाढला; ‘हे’ 4 वॉर्ड बनू शकतात हॉटस्पॉट

0
36

मुंबईत लोकलसेवा सुरू झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याची चिन्ह दिसत होती. आता मात्र सर्व चित्र उलट होताना दिसत आहे. चेंबूर, टिळक नगर, बोरीवली, मुलुंड, अंधेरी या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अंधेरीपूर्वतील के ईस्ट वॉर्ड, मुलुंडचा टी वॉर्ड, बोरीवलीमधील आर सेंट्रल वॉर्ड आणि चेंबूरच्या टिळक नगरमधील एम वेस्ट या 4 वॉर्डमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने, हे वॉर्ड हॉटस्पॉट बनण्याची शक्यता आहे. मुलुंडमध्ये रुग्णवाढीचा दर सर्वात जास्त आहे.दिवसेंदिवस मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असून, काल मुंबईत 3663 रुग्णांची वाढ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून कोरोनाचे प्रोटोकॉल पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.