पालघर रेल्वे परिसरात वाहने उभी करण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी

0
43

पालघर : लोकलसेवा सर्वसामांन्यांसाठी सुरु झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरात वाहने उभी करण्यास परवानगी दिली आहे. टप्प्याटप्प्याने ही परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पालघर स्थानकाबाहेर 22 रिक्षा व तीन बस गाड्या उभे करण्याची मुभा देण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान रेल्वे परिसरात पत्रे व अडचणी उभारुन बंदिस्त करण्यात आले होते, त्यामुळे रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होऊ लागली होती. अनेक दिवस रेल्वे सेवा बंद राहिल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची पाळी आली होती. त्याचप्रमाणे रिक्षा थांबे उपलब्ध नसल्याने रस्त्यालगत रिक्षा उभ्या करण्यात येत होत्या. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकात तीन व सहा आसनी रिक्षांना उभे करण्यास परवानगी दिल्याने रेल्वेतून प्रवास करून येणाऱ्या नागरिकांना सोयीचे ठरणार आहे.

  • पालघर रेल्वे परिसरात वाहने उभी करण्यास परवानगी
  • लॉकडाऊन लागल्यापासून परिसरात होती वाहनांना बंदी
  • पहिल्या टप्प्यात 22 रिक्षा व तीन बस गाड्या उभे करण्याची मुभा
  • रिक्षाचालकांरील मोठं संकट झालं दूर