पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स 8.50 रुपयांनी कमी होणार?

0
36

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडले आहे. मात्र आता टॅक्स कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकार करापोटी पेट्रोल-डिझेलवर मोठी रक्कम आकारते. त्यामुळे सरकार एक्साइज ड्यूटी 8.50 रुपये प्रति लिटरपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरही भार पडणार नाही. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे. सरकार 15 मार्चनंतर यावर निर्णय घेण्याची शक्यत आहे. केंद्र सरकारने 2014 ते जानेवारी 2016 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्याचा फायदा घेत नऊ वेळा एक्साइज ड्यूटी वाढवली होती.