देशात सलग 12 व्या दिवशी इंधन दरवाढ

0
50

जागतिक स्तरावर इंधनाचे दर कमी झाले असताना भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग 12 व्या दिवशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 39 पैशांनी वाढ झाली असून पेट्रोल 90.58 रुपये प्रति लीटर इतकं झाले आहे. तर डिझेलच्या दरात 37 पैशांनी वाढ झाली असून दर 80.97 रुपये इतका झाला आहे. गेल्या 12 दिवसात दिल्लीत पेट्रोल 3.64 रुपयांनी तर डिझेल 4.18 रुपयांनी महागले आहे. मुंबईतही पेट्रोल 97 रुपये प्रति लीटर झाले आहे. पेट्रोलच्या किंमतीत 38 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेल 39 पैशांनी महागले असून 87.06 प्रती लीटर झाले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत 98.60 रुपये प्रती लीटर इतकी झाली आहे. तर जयपूरमध्ये पेट्रोल 97.10 रुपये प्रती लीटर आहे.