पीएम इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्राची मंजुरी; दोन दिवसीय श्रीलंका दौरा

0
53

भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्रातून जाण्याची परवानगी दिली आहे. इम्रान खान पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ, उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यापारी शिष्टमंडळासह श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. हा श्रीलंका दौरा दोन दिवसांचा असणार आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीचे आयोजन आहे. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षा, कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पर्यटन या विषयावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान राजपक्षे यांच्या निमंत्रणानंतर इम्रान खान यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

यापूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या विनंतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तान दौऱ्यासाठी पाकिस्ताननं हवाई क्षेत्रातून जाण्याची परवानगी दिली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या मार्गाने किर्गिस्तानला गेले होते.