पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

0
32

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशभरात आजपासून दूसऱ्या टप्प्यातील लसीकरण अभियान सुरु झाले आहे. या टप्प्यात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीचा पहिला डोस घेतला. सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी लस घेतली. त्याचबरोबर कोरोना लस घेण्याचं नागरिकांना आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बॉयोटेकची कोव्हॅक्सिन ही लस घेतली. परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदींना लसीचा पहिला डोस दिला. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. या लसीला भारतात मंजुरी देण्यात आली आहे.