विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा तामिळनाडू दौरा

0
29

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारीला तामिळनाडू दौऱ्यावर जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला महत्त्व आहे. या दौऱ्यात पंतप्रधान काय घोषणा करतात याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.

यंदा पाच राज्य-केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी आणि आसाम या पाच राज्य-केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात या निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता आहे.