मेड इंडिया खेळणी महोत्सवाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन

0
41

द इंडिया टॉय फेयर-2021 चं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. वोकल फॉर लोकल अंतर्गत या खेळणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, महिला व बाल विकास आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी आतापर्यंत 10 लाखाहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. देश खेळणी बनवण्यात आत्मनिर्भर होण्याचा मुख्य हेतू आहे. तसेच खेळण्याची निर्यात करण्याचा सरकारचा मानस आहे.
‘भारतीय खेळण्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा हेतू आहे. हँडमेड मेड इन इंडिया खेळण्याची खूप मागणी आहे.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनावेळी सांगितले.