पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

0
30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होणार आहे. CERAWeek जागतिक उर्जा आणि पर्यावरण नेतृत्त्व या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय उर्जा संमेलनाचे आयोजक मार्किट यांनी याबाबत माहिती दिली. भारत जागतिक उर्जा आणि पर्यावरणाच्या केंद्रस्थानी आला आहे. सार्वत्रिक उर्जा उपलब्धता सुनिश्चित करताना शाश्वत भविष्यासाठी हवामान बदलांच्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी त्याचं नेतृत्व महत्त्वपूर्ण आहे असं सांगत हा त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे मार्किट यांनी सांगितले. पुढील आठवड्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून देशाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला जाणार आहे. विशेष म्हणजे या संमेलनाला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे दूत जॉन कॅरी, बिल अँड मेलिंडा फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष आणि ब्रेक थ्रू एनर्जीचे संस्थापक बिल गेट्स आणि सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन नासिर हे उपस्थित राहणार आहेत.