पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल ट्रस्टच्या अध्यक्षांसह तीन जणांना कोरोनाची लागण

0
37

दोन दिवसांपूर्वी मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर शक्तिप्रदर्शन केले होते. त्यावेळी कोरोनाचे नियम पायदली तुडवून हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली होती. आता पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबीरदास महंत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासोबत आणखी दोन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. पोहरादेवी गडावरील गर्दीनंतर त्यांना ही बाधा झाली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोनाचा फैलाव होण्यासाठी ही गर्दी कारणीभूत ठरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. आता याप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे