मुंबई पॉर्न प्रकरणात सेलिब्रिटी व्यावसायिकावर पोलिसांची करडी नजर

0
37

एक सेलिब्रिटी व्यावसायिक आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याची पॉर्न रॅकेटप्रकरणी चौकशी केली जात आहे. प्रोडक्शन हाऊसमध्ये नग्न अवस्थेत पोझ देण्याच्या मॉडेलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान पोलिसांनी एका मॉडेल आणि इतर 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सामूहिक बलात्कार आणि गैरकृत्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 24 वर्षीय मॉडेलने बळजबरीने आपल्याकडून सेक्शुअल ऍक्ट करवून घेतल्याचा आरोप केला असून पोलीस याची सखोल चौकशी करत आहेत.