लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणी जसप्रीत सिंगला अटक

0
54

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात २६ जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी जसप्रीत सिंग याला अटक केली. हिंसाचाराच्या वेळी लाल किल्ल्याच्या घुमटावर चढल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यावेळी त्याने सळई उचललेली होती.२६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झालेले १६ शेतकरी बेपत्ता असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला होता. मात्र, हिसांचार करणाऱ्या १२२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.