जळगावमध्ये बेकायदेशीर गुटखा विकणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

0
43

जळगावमध्ये बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधीत पान मसाला विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील कंवर नगर आणि तांबापूर परिसरात एकाच मालकाची दोन दुकानं होती. या दुकानांवर पोलिसांनी छापा मारला. या छापेमारी दरम्यान पोलिसांनी सुमारे 2 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून एक जण अद्याप फरार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फरार आरोपीच्या शोधात आहे.