विमान परवानगीवरुन राजकारण तापले, नेमकं खरे कुणाचं?

0
30
SOURCE- KOSHYARI TWITTER HANDLE
SOURCE- KOSHYARI TWITTER HANDLE

विमान वापरण्याच्या परवानगीवरून सरकारची कोणतीही चूक नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. परवानगी मिळाली आहे की नाही याबाबत माहिती घ्यायला हवी होती असा दावा राज्य सरकारने केला आहे. खात्री न केल्यानेच राज्यपालांचा खोळंबा झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत राजभवन सचिवालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दुसरीकडे राज्यपालांच्या सचिवालयाने महाराष्ट्र सरकारच्याअधिकाऱ्यांना 2 फेब्रुवारीला विमान वापरण्याची परवानगी मागितली होती. तसे पत्रही पाठवले होते. त्यामुळे राज्यपाल विमानतळावर गेले होते. मात्र तिथे त्यांना परवानगी नाकारण्यात आली. आता राज्य सरकारने स्पष्टीकरण दिल्याने नेमकं खरे कोण आणि खोटं कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर या प्रकरणामुळे राजकारण मात्र चांगलेच पेटले आहे