पूजा चव्हाणच्या वडिलांची माघार! म्हणाले ‘आम्हाला शांततेत जगू द्या…

0
187

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवनवीन गोष्टी उघड व्हायला लागल्या आहेत.आतापर्यंत वनमंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण या तिघांवर संशय व्यक्त केला गेला आहे. मात्र, अद्यापर्यंत या तिघांपैकी एकानेही पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या.यामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
आता यामध्ये पूजा चव्हाणचे वडिलांची माघार घेत असल्याची माहिती समोर येत आहे.आमची कोणावरच तक्रार नाही, मला पाच मुली आहेत, आम्हाला जगू द्या, अशी विनंती सुद्धा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केली. शनिवारी सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई पूजा चव्हाणच्या कुटुंबियांना भेटल्या आहेत. मात्र आता तक्रारच नसल्यामुळे पूजा चव्हाण प्रकरण थंडावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.