पाॅर्न व्हिडिओग्राफी प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीला अटक

0
62

पॉर्न व्हिडिओ ग्राफी प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वेब सिरीजच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड केले जात होते. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मढ येथील एका बंगल्यावर धाड टाकली होती. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती आणि एका मुलीची सुटका केली होती. यावेळी या माहितीचा खुलासा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवत अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला अटक केली. तिला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठ हिने आत्तापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तसेच एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेब सिरीजमध्येही भूमिका साकारली होती. दाक्षिणात्य चित्रपटातही तिने अनेक भूमिका केल्या आहेत.