‘Porn Vs Prostitution’ आणि पॉर्न ऍक्टर्स ,अटकेनंतर राज कुंद्राचे जुने ट्विट व्हायरल

0
20

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. अश्लील चित्रपट बनवण्याप्रकरनात अभिनेत्रीचा पती मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे.अटकेनंतर राज कुंद्रा यांचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वेश्याव्यवसाय आणि पॉर्नबद्दलच्या काही कायद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. २ मार्च २०१२ रोजीच्या ट्वीटमध्ये राज कुंद्रा यांनी वेश्याव्यवसाय हा पोर्नपेक्षा वेगळा कसा आहे असा प्रश्न विचारताना कॅमेर्‍यावर सेक्ससाठी एखाद्याला पैसे देणे कायदेशीर का आहे, असा सवाल केला होता.


पॉर्नबद्दल व्यावसायिकाच्या विचारांवर आणखी एक ट्विटही 3 मे 2012 रोजी ट्विटरवर टाकले होते या ट्विटमध्ये ते म्हणाले होते की ‘भारतात अभिनेते क्रिकेट खेळताय क्रिकेटपटू राजकारण खेळताय आणि राजकारणी पॉर्न पाहतात तर पॉर्न स्टार ऍक्टर्स बनत आहेत’