राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली कोरोनाची लस, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

0
34

सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेमध्ये सहभाग दर्शवत राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांनी दिल्लीतील आर्मी आर अँड आर रुग्णालयात जाऊन कोरोना लस घेतली आहे. हि माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आलीये.

मात्र, लस घेताना राष्ट्रपतींच्या तोंडाला मास्क नसल्याचे फोटोमध्ये आढळून आले. त्यामुळे हा  फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील  लस घेताना चेहऱ्यावरील मास्क हातात धरला होता. त्यामुळे, मोदींना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. 

1 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस घेतली. त्यानंतर शरद पवार यांनीही सहभाग दर्शवत मुंबईत जे.जे.रुग्णालयात कोरोना लस घेतली.