पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही देशातील विविध गोष्टींबाबत भाष्य करण्यात आलं. कोरोनाशी लढा देण्यासाठी व्हॅक्सिनचा पुरवठा आणि निर्मितीबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी हवामान बदल आणि इतर बाबींवरही विचारांची देवाणघेवाण केली. कॅनडा आणि भारताची लोकशाही तत्त्वांबद्दलची वचनबद्धता, अलीकडील आंदोलन आणि संभाषणातून समस्यांचे निराकरण करण्याच्या महत्त्वांवर या नेत्यांनी चर्चा केली. अधिक शाश्वत आणि लवचिक जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीत एकत्रितपणे कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
Home BREAKING NEWS नरेंद्र मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांनी विविध विषयांसोबत शेतकरी आंदोलनावरही केली चर्चा