पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

0
32

माजी मुख्यमंत्री अन काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सत्त्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात ताब्यात घेतले. कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी ही कारवाई केली.दक्षिण कराड या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाणांचे प्राबल्य राहिले आहे. सत्त्वशीला चव्हाणही कराड तालुक्यात चांगल्याच सक्रिय आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्त्वशीला चव्हाण मैदानात उतरल्याचे पाहायला मिळातेय.

  • पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण  पोलिसांच्या ताब्यात
  • त्यांना कराड तालुक्यातुन ताब्यात घेतले
  • कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी केली कारवाई