अर्थमंत्री अजित पवारांविरोधात हक्कभंग

0
18

मागील अधिवेशनात विकास मंडळं स्थापन करण्याचं दिलेले आश्वासन न पाळल्याने भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याविरोधात हक्कभंगाची मागणी केली होती. ही मागणी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मान्य केली आहे. मंडळ स्थापन न करणे हा सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्‍ट्राचा विकास साधण्यासाठी वैधानिक विकास मंडळं असणे अत्‍यंत गरजेचे आहे. मात्र राज्‍य सरकार गंभीर नसल्याचे सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली. या विभागावर निधी वितरणासंदर्भात अन्‍याय होण्‍याची भितीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.