माजी केंद्रीय मंत्री एमजे अकबर यांनी प्रिया रमानी विरोधात दाखल केलेली मानहानीची याचिका दिल्ली कोर्टाने फेटाळून लावली आहे. दोन्ही पक्षांचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. यावर आज निर्णय देताना प्रिया रमानी हिची निर्दोष मुक्तता केली आहे. महिलांना आपली तक्रार करण्याचा अधिकार असल्याचे कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले.
मीटू मुव्हमेंट दरम्यान प्रिया रमानी हिने एमजे अकबर यांच्या विरोधात ट्विट केले होते. त्यानंतर अकबर यांनी रमानी विरोधात 15 ऑक्टोबर मानहानीचा दावा दाखल केला होता.