महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सरकारी विमानाने प्रवासाची परवानगी नाकारल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार सूड भावनेने असे वागत असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
‘देशात व्हिव्हिआयपी कल्चर नसले पाहीजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणणं आहे. राज्यपाल कोश्यारी सरकारी विमान राज्यात कुठेही नेऊ शकतात. मात्र खासगी कामासाठी या विमानाचा वापर करु शकत नाही. सरकारी विमान राज्याच्या कामासाठी आहे. राज्यात कुठेही जाण्यास मनाई नाही. मात्र खासगी कामासाठी वापर करणे चुकीचे आहे’, एका वृत्तवाहिनीला शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ही माहिती दिली.