प्रियांकाने पुस्तकाबद्दल मानले वाचकांचे आभार

0
109

‘अनफिनिश्ड : अ मेमोईर’ हे प्रियांका चोप्राचं पुस्तक नुकतंच सर्वांच्या भेटीला आलं आहे. या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं प्रियांकाने वाचकांचे आभार मानले आहेत. “माझ्या पहिल्या पुस्तकाला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. मला आशा आहे की तुम्ही माझी अनफिनिश्ड स्टोरी एन्जॉय करत असाल,” अशी अपेक्षा प्रियांकाने व्यक्त केली आहे. प्रियांकाच्या या पुस्तकात तिच्या करियरच्या प्रवासातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे. फक्त पडद्यावर दिसणाऱ्या प्रियांकाचं बाकीचं आयुष्य कसं होतं हे या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.