नीट परीक्षेची तारीख जाहीर

0
29

मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीटच्या परीक्षेची तारीख  जाहीर झाली असून आता हि परीक्षा यंदा 1 ऑगस्टला होणार आहे. तसेच एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेची हि परीक्षा मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत घेतली जाते. इंग्रजी हिंदीसह एकूण 11 भाषेत ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा, अभ्यासक्रम व अर्ज भरण्याबाबत माहिती नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. परीक्षेच्या अर्जाबाबत लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे.