डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटविण्यासाठी संसदेत मांडला प्रस्ताव! महाभियोगची कारवाई सुरू…

0
2

अमेरिकेच्या राजधानीत झालेल्या हिंसाचाराबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध बंडखोरी करण्यास उद्युक्त केल्याच्या आरोप असून त्यांच्याविरुद्ध आर्टिकल ऑफ इंपिटमेंट (महाभियोग) डेमोक्रॅटने आणला आहे

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ जवळपास 9 दिवसही नाही उरलाय
  • 20 जानेवारी रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन हे शपथ घेणार आहेत
  • अशा परिस्थितीत अमेरिकेच्या राजधानीत झालेल्या प्रचंड हिंसाचाराबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध बंडखोरी करण्यास उद्युक्त केल्याच्या आरोप आहे
  • यावरून त्यांच्याविरुद्ध आर्टिकल ऑफ इंपिटमेंट (महाभियोग) डेमोक्रॅट कडून आणल्या गेला
  • ट्रम्प यांना दोषी ठरवल्यास त्यांना पदावरून काढून टाकले जाईल
  • आणि सध्या उपराष्ट्रपती माइक पेंस त्यांची जागा घेतील
  • प्रतिनिधी सभागृहात महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्यास ते सिनेट मध्ये सुनावणीसाठी जाईल