महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या निर्देशिकेचे मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

0
44

मुंबई: महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने तयार करण्यात आलेली निर्देशिका (डिरेक्टरी 2021) ही केवळ शासकीय संपर्क असलेली यादी नाही तर शासनाशी संबंधित सर्व घटकांसाठी उपयुक्त ठरेल, असे मत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या डिरेक्टरी 2021 चे प्रकाशन मंत्री ॲड.ठाकूर यांच्या हस्ते झाले.दरवर्षी महासंघाकडून प्रकाशित होणाऱ्या या दैनंदिनीमध्ये मंत्री कार्यालयाचा पत्ता, दूरध्वनी, ईमेल तसेच विविध विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा पातळीवर शासकीय कार्यालयांचे संपर्क यांचे अद्ययावत तपशील असतात. मंत्रालय ते जिल्हा अशा सर्व शासकीय यंत्रणांचे तपशील असलेल्या या डिरेक्टरीचा उपयोग मंत्रालयासह इतर शासन यंत्रणा, सचिव, लोकप्रतिनीधी सर्वांनाच होत असतो. अशी अद्ययावत यादी डिरेक्टरी रुपाने प्रकाशित केल्याबद्दल ॲड.ठाकूर यांनी महासंघाचे कौतुक केले.