पुडुचेरीतील काँग्रेस सरकार पडलं

0
32
CONGRESS LOGO
CONGRESS LOGO

पुडुचेरी विधानसभेत काँग्रेस बहुमत सिद्ध न करु शकल्याने सरकार पडले. विधानसभेत काँग्रेसला 9 आमदारांसह 2 डीएमके आणि एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा आहे. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी 14 आमदारांची आवश्यकता आहे. यापूर्वी मुख्यमंत्री नारायणसामी यांनी बहुमत असल्याचा दावा केला होता.

पुडुचेरी विधानसभेत 30 आमदार आहेत. तर 3 सदस्य केंद्र सरकारकडून निवडले जातात. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. त्यात 6 आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस सरकार अडचणीत आले होते.