पुण्यातील गुंड गजानन मारणेला अटक

0
31

पुण्यातील गुंड गजानन मारणेला पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली आहे. कोरोनामुळे लागू असलेल्या साथ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केलं होतं. कोरोनामुळे लागू असलेल्या कायद्याचे उल्लंघन करून बेकायदा गर्दी जमवणे, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे अशा प्रकारचे गुन्हे गजानन मारणेवर नोंदवण्यात आले आहेत. सोबतच पोलिसांनी दोनशे ते अडीचशे जणांवर गुन्हा नोंदवला आहे. ज्यांची नावे माहित झाली अशा 26 पैकी एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गजानन मारणेवर पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनला देखील गुन्हा दाखल झाला असून त्या प्रकरणात देखील त्याला अटक होण्याची शक्यता आहे.