पुण्यात सध्यातरी लॉकडाऊन नाही- जिल्हाधिकारी

0
31

कोरोना रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होईल या चर्चांना उधाणा आला आहे. याबाबतचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता व्हिडिओवर खुद्द जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अशाप्रकारच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू, नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होईल अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र असे कोणतेच आदेश पुणे जिल्हा प्रशासनाने दिले नाही असं देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे खोडसाळ वृत्त व्हायरल करण्याऱ्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.