मास्कच्या नादात पुणेकर विसरले हेल्मेट !, दहा दिवसात ३ कोटी ९४ लाखांचा दंड वसूल 

0
48

पुणे: दरवर्षी ट्रॅफिक रुल्स तोडल्याने लाखोंचा दंड नागरिकांकडून वसूल केला जातो. यामध्ये यावर्षी कोरोनामुळे मास्क न घालता गाडी चालवल्यास सुद्धा दंड लागतो आहे. पुण्यात पोलिसांची याबाबद कडक कारवाई सुरु आहे. यामध्ये विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या नागरिकांवर पुणे पोलिसांनी कारवाई मोठी कारवाई केली. गेल्या दहा दिवसात 78,669 जणांकडून 3 कोटी 94 लाख 4 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केल्या गेला. चौका- चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहे.याद्वारे ही कारवाई करण्यात आली असून सिग्नल तोडणे, दुचाकीवर तिघे फिरणे, नंबर प्लेट नसणे, यावरती पोलीसांकडून जोरदार कारवाई, वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट वापरण्याचे सुद्धा आवाहन केले.मास्कच्या नादात पुणेकर विसरले हेल्मेट !अस म्हणायला मात्र हरकत नाही.